दुंडगे येथे मराठी शाळेच्या विद्यार्थांनी साकारलेली दिंडी |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
आषाढी एकादशीचे औचित्य साधून दुंडगे (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संताच्या वेषात वारकरी दिंडीचे आयोजन केले होते. प्रारंभी दिंडीचे पूजन सरपंच राजेंद्र पाटील यांनी केले.
सर्व विद्यार्थ्यांनी विविध संताचे पोषाख करून विठ्ठल रखुमाईचे नामस्मरण करत संपूर्ण गावातून दिंडी काढण्यात आली. संपूर्ण गावातील ग्रामस्थानीही सहभाग घेतला. प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाईचे आगमन झाल्यावर आपणही वारीत सहभागी झाल्याचा आनंद सर्वांच्या मुखावर दिसत होता. प्रत्येक घरासमोर विठ्ठलाच्या पायावर पाणी घालून चरण स्पर्श करून नतमस्तक होत होते. ग्रामस्थांना प्रत्यक्ष पंढरीच्या वारीत सहभागी झाल्या सारखे वाटत होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्जुन जाधव, उपाध्यक्ष कल्पना पाटील, सौ. बामणे, मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा आंबेवाडकर, रमेश कांबळे, सागर खाडे, पा. रा. पाटील, विनोद चव्हाण, आदीनी दिंडी यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment