दरवर्षी ६ जुलै २०२१ रोजी कुदनूर येथे ढगफुटी सदृश्य पावसामुळे गावातील मुख्य रस्त्याला असे ओढ्याचे स्वरूप आले होते. (संग्रहित छायाचित्र) |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कुदनुर (ता. चंदगड) येथे गतवर्षी ६ जुलै २०२१ रोजी दुपारी ३ ते ४.३० दरम्यान आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली होती. गावातील सर्वच गल्ल्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. गावाच्या मध्यभागातून जाणाऱ्या कालकुंद्री ते राजगोळी या बाजारपेठ रस्त्याने पाण्यामुळे ओढ्याचे रूप धारण केले होते. या मुख्य रस्त्यावरील अनेक घरांत पाणी घुसल्यामुळे ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली होती. घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले होते. काही धाडसी तरुण व ग्रामस्थ या धोकादायक प्रवाहातून इकडे तिकडे फिरताना दिसत होते. या घटनेला आज वर्षपूर्ती झाली. याच्या आठवणी पाण्यातून फिरणाऱ्या अतिउत्साही व नुकसानग्रस्त ग्रामस्थांना आजही ताज्या आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत चंदगड तालुक्यातील पर्जन्यमान यंदा पंचवीस टक्केच आहे. गेल्या दोन दिवसात पर्जन्य राजाने दमदार हजेरी लावली असून बळीराजांने या पावसाचे स्वागत केले आहे. उगवण झालेली भात पिके पाण्यासाठी आसुसली आहेत. रोप लावणीचा हंगाम तोंडावर असून यासाठी दमदार पावसाची आवश्यकता असल्याने सुरू असलेला पाऊस येत्या पंधरा-वीस दिवसांत असाच सुरू राहावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.
No comments:
Post a Comment