माजी ग्रंथपाल प्रा. पी. सी. पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2022

माजी ग्रंथपाल प्रा. पी. सी. पाटील यांचे निधन

प्रा. पी. सी. पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          होसुर (ता. चंदगड) येथील रहिवसी व  कोल्हापूर येथील न्यु काॅलेजचे माजी ग्रंथपाल  प्रा पाडुरंग चुडाप्प्पा पाटील उर्फ पी. सी. पाटील  (वय वर्ष ८०) यांचे कोल्हापूर येथे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रा. पाटील यांनी खेडूत शिक्षण मंडळाचे  संचालक, कोवाड येथील सर्वोदय शिक्षण संस्था अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ सिनेट मेंबर आदी पदावर काम केले होते. चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या जाण्याने चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. आज (शनिवारी) सायंकाळी चार वाजता कोल्हापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment