चंदगड बाह्य वळण रस्त्यांसाठी १७ कोटी ३४ लाखाची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2022

चंदगड बाह्य वळण रस्त्यांसाठी १७ कोटी ३४ लाखाची मागणी
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

चंदगड जुने बसस्टँड ते हेरे जोड रस्ता बाह्यवळण राज्यमार्ग १८९ च्या जमिनीच्या भूसंपादन, पाडवलेल्या इमारतींसाठी नुकसान भरपाई रक्कम इ. सर्व भरपाई रक्कम रू १७ कोटी ३४ लाख रक्कमेचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम उपविभाग चंदगड यांनी केल्याची माहिती राज्य प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष प्रा. विजयभाई पाटील यांनी दिली आहे.

गेली दोन वर्षे चंदगड रिंग रोडचे काम सुरू होते - शेतक‍र्‍यांना मोबदला न देताच रिंग रोडचे काम पूर्ण करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा डाव होता परंतु रिंगरोड मध्ये जमिनी गेलेल्या शेतक‍र्‍यांनी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष प्रा. विजयभाई पाटील यांच्याकडे मार्गदर्शन व नेतृत्वाची विनंती करताच सर्वप्रथम प्रा. विजयभाई पाटील, सचिव आसिस कुटीन्हो, शिवाजी कुंभार, शब्बीर सय्यद, किरण मुळीक यांच्या नेतृत्वाखाली चंदगडच्या तहसीलदारांना मोबदला मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला मोबदला मागणीसाठी निवेदन देण्यात आले. त्यानंतर ही त्यांनी दाखल न घेतल्याने प्रा. विजयभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाने आसिस कुटिन्हो शब्बीर सय्यद व किरण मुळीक यांनी 7 ते 9 मार्च असे तीन दिवस सार्वजनिक बांधकाम विभागा समोर आमरण उपोषण केल्यानंतर त्यांनी चंदगड नगरपंचायतीकडे बोट दाखवले. चंदगडच्या शेतकर्‍यांनी चंदगड नगर पंचायतीला आमरण उपोषणाचा इशारा देताच चंदगड रिंगरोडच्या भूसंपादनाचा विषय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याचे पत्र प्रकल्पग्रस्त संघटनेला दिले. प्रकल्पग्रस्त संघटनेने बांधकाम विभागाला आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला.

 प्रा. विजयभाई पाटील आसिस कुटिनो, सतीश सबनीस यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधका विभाग कोल्हापूर यांचेकडे एप्रिल २०२२मध्ये निवेदन दिले होते. अशा प्रकारे प्रकल्पग्रस्त संघटनेच्या जबरद्स्त पाठपुराव्यामुळे बांधकाम विभागाला भूसंपादनाचे मूल्यांकन करणे भाग पडले व एकूण १७ कोटी ३४ लाख रू. चे बजेटची मागणी चंदगडचे उप अभियंता कारंडे यांनी कार्यकारी अभियंता कोल्हापूर यांचे कडे केलेली आहे. चंदगडच्या शेतकर्‍यांना यापेक्षा ही वाढीव भरपाई मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणारे असल्याचे प्रा.पाटील यांनी सागितले.

No comments:

Post a Comment