सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचा २८ रोजी निपाणीत गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2022

सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचा २८ रोजी निपाणीत गौरव

 

सुभेदार मेजर गजानन चव्हाण

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
       भारतीय सेनेतून शांती सेनेच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेतील कांगो देशात निपाणी चे सुपुत्र सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ते सध्या सुट्टीवर आलेले असताना निपाणी शहरवासीयांच्या वतीने त्यांच्या अभूतपूर्व कार्याची दखल घेत दि. २८ जुलै रोजी गौरव समारंभाचे आयोजन केले आहे.
   गेल्या काही महिन्यांपासून इंडियन रॅपिड रिप्लायमेंट म्हणून दक्षिण आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो देशात संयुक्त राष्ट्र संघ शांती सेनेच्या माध्यमातून जगातील बारा देशांचे सैन्य दाखल झाले आहे. भारतातून गेलेल्या शांती सेनेत सेवन मराठा लाईट इन्फंट्री बटालियन मध्ये गजानन चव्हाण सुभेदार मेजर या अधिकारी पदावर कार्यरत आहेत. आफ्रिकेत गेल्यापासून तेथील लाखो रहिवाशांचा न्यायरागोंगो या विनाशकारी ज्वालामुखी पासून बचाव करणे, कांगो अंतर्गत बंडखोर, शेजारी देशांचे हल्ले यातून कांगोचा बचाव करण्याचे कार्य सेवन मराठा व अन्य देशांच्या सेनेने केले आहे. सुभेदार मेजर चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज, आपले वडील स्वातंत्र्यसैनिक कै गोविंदराव चव्हाण आई कै कृष्णाबाई चव्हाण यांचा आदर्श व संस्कार याच्या जोरावर भारतीय सैनिकांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव या युद्धगर्जनेसह करून घेतलेल्या कामाबद्दल कांगोतील रहिवाशांमध्ये 'इंडियन आर्मी' बद्दल कमालीचा आदरभाव निर्माण झाला आहे. सेवन मराठा लाईट इन्फंट्री च्या या कार्याची दखल संयुक्त राष्ट्र संघानेही घेतली व सुभेदार मेजर गजानन चव्हाण व सैन्याला पदक देऊन सन्मानित केले. त्याबद्दल निपाणी शहर व वासियांच्या वतीने त्यांच्या गौरव समारंभाचे आयोजन २८ जुलै २०२२ रोजी दुपारी ४ वाजता अक्कोळ रोड,  सोमनाथ मंदिर पेट्रोल पंप जवळ तेली बिल्डिंग येथे केले आहे तरी सर्व हितचिंतक व मित्रमंडळींनी उपस्थित राहावे, असे आवाहन गौरव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment