चंदगड तालुक्यातील गुडेवाडीचे सुपुत्र डाॅ. परशराम पाटील यांनी केली अमित शहांसोबत कृषी व सहकाराबाबत चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2022

चंदगड तालुक्यातील गुडेवाडीचे सुपुत्र डाॅ. परशराम पाटील यांनी केली अमित शहांसोबत कृषी व सहकाराबाबत चर्चा

अमित शहा यांच्याशी चर्चा करताना डाॅ. परशराम पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

                कृषी व सहकार क्षेत्राच्या विकासासाठी केंद्रीय गृह तसेच सहकार मंत्री अमित शहा देशभरातील तज्ज्ञांशी चर्चा करीत आहेत. त्त्याच धर्तीवर अमित शहा यांनी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डाॅ. परशराम पाटील यांना चर्चेसाठी दिल्लीत बोलावले होते. 

           सहकारातून ग्रामीण भाग समृद्ध करून भारताला कृषी क्षेत्रात महाआर्थिक शक्ती बनवण्यासाठी अमित शहा अहोरात्र प्रयत्न करीत असल्याची भावना डाॅ. पाटील यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, शहा यांनी गांभीर्याने अनेक समस्या जाणून घेतल्या. सहकार व कृषी क्षेत्राचा विकास व विस्तारासाठी काही धोरणात्मक बदल पाटील यांनी सरकारला सुचवले आहेत. त्याचा गांभीर्याने विचार करू असे आश्वासन शहा यांनी दिले.   मोदी सरकारच्या  कृषी-अर्थकारण, सहकार क्षेत्रातील लक्षणीय योजनांमुळे ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार असल्याची भावना शहा यांच्याकडे पाटील यांनी व्यक्त केली.

            गुडेवाडी- चंदगडचे सुपूत्र असलेले डाॅ. परशराम पाटील आशियाई विकास, बँक, युनायटेड नेशन्स, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारत सरकार इत्यादी विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांवर काम करणारे आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ आहेत, सध्या ते नेहरू मेमोरिअल लायब्नरी या प्रतिष्ठित संस्थेचे फेलो आहेत. त्यांचे वडील जकाप्पा व आई कमल यांच्यामुळे हे यश मिळवल्याची भावना डाॅ. पाटील यांनी व्यक्त केली. 

               आरबीआयचे संचालक व सहकार-अर्थ शास्त्रज्ञ सतीश मराठे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डाॅ. नरेंद्र जाधव, आयसीसीएसआरचे संचालक डाॅ. विनय सहस्त्रबुद्धे, आयएएस अधिकारी डाॅ. श्रीकर परदेशी, भारतीय किसान संघाचे दिनेश कुलकर्णी, माजी खासदार डाॅ. प्रभाकर कोरे, माजी परराष्ट्र सचिव डाॅ. ज्ञानेश्वर मुळे, डीआर गाडगीळ सस्टेनेबल विलेज सेंटरचे समन्वयक डाॅ. कैलास बवले, डाॅ. श्रीकृष्ण महाजन यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment