चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवा निमित्ताने कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रथम बॅचच्या पदवीधरांचा सत्कार समारंभ व स्नेह मेळावा दि. 27 जुलै रोजी सकाळी १० वा. एस . एन. पाटील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक लक्ष्मण गावडे आणि शिवाजी विद्यापीठाचे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. आर. व्ही. गुरव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन समन्वयक प्रा. डॉ. के. एन. निकम यांनी केले आहे. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी पहिल्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे.
No comments:
Post a Comment