अडकूर येथे हर घर तिरंगा जनजागृतीसाठी श्री शिवशक्ती हायस्कूलची जनजागृती फेरी - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2022

अडकूर येथे हर घर तिरंगा जनजागृतीसाठी श्री शिवशक्ती हायस्कूलची जनजागृती फेरी

हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत अडकूरमध्ये फेरी काढताना शिवशक्ती हायस्कूलचे विद्यार्थी

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

           भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्य हर घर तिरंगा या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) यांच्या वतीने फेरी काढण्यात आली.  प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही फेरी विविध घोषणा देत संपूर्ण अडकूर गावातील सर्व गल्यातून काढण्यात आली. 

            हातामध्ये तीरंगा ध्वज व जनजागृती बॅनर घेऊन सर्व ग्रामस्थाना हर घर तिरंगा या मोहिमेची जाणीव करून देण्यात आली यावेळी अडकूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक डी. आर. घेवडे, ग्रामपंचायत सदस्य बंडू चंदगडकर, शिरीन शेख, बंकट हिशेबकर, आय. वाय. गावडे, एस. एन. पाडले, एस. एन. पाटील, एस. के. पाटील यांच्यासह विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment