मलतवाडी ग्रामस्थांचा सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा, काय आहे कारण............ - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2022

मलतवाडी ग्रामस्थांचा सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा, काय आहे कारण............चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            मलतवाडी (ता. चंदगड) येथील तलावा शेजारी डांबर व खडी मशीन प्रकल्प सुरू करण्यास ग्रामपंचायत सदस्यांनी नागरिकांना विश्वासात न घेता ना हरकत दाखला दिला आहे. याच्या निषेधार्थ व हा प्रकल्प बंद करावा या मागणीसाठी सोमवार दि. २९ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत  कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.                                तलावाच्या शेजारी सुरू असलेल्या या डांबर व खडी मशीन प्रकल्पामुळे तलावातील पाण्याचे व हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. या तलावातील पाणी नागरिक पिण्यासाठी वापरत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प त्वरित बंद करावा, अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे. या मोर्चाची दखल न घेतल्यास ठिय्या आंदोलन, उपोषण असे मार्ग अवलंबावे लागतील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment