कोवाड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी यादव, उपाध्यक्षपदी सौ. कांबळे - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2022

कोवाड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी यादव, उपाध्यक्षपदी सौ. कांबळे

रामा आप्पाजी यादव

सौ.  अंजना गोपाळ कांबळे

कोवाड  : सी. एल. वृत्तसेवा

             शाळा व्यवस्थापन तथा तंबाखू नियंत्रण समिती केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड (ता. चंदगड) च्या अध्यक्षपदी रामा आप्पाजी यादव तर उपाध्यक्षपदी सौ.  अंजना गोपाळ कांबळे यांची  बिनविरोध निवड करण्यात आली. शाळेच्या नुकत्याच झालेल्या पालक मेळाव्यात आठ पालक प्रतिनिधींची निवड करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण तज्ञ, ग्रामपंचायत, शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या पहिल्या सभेत पदाधिकारी निवड करण्यात आली. 

        व्यवस्थापन समितीची उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे विष्णू बाळाराम जोशी, अमोल जयवंत राजगोळकर, भरत पांडुरंग पाटील, सौ संजीवनी अनंत भोगण, सौ लक्ष्मी रामा सुर्वे, पुनम चंद्रकांत जाधव, सौ पूजा पराग भोसले, दीपक रामू वांद्रे, मधुमती गुंडू गावस, कु. नंदिनी विनायक कुंभार, शौर्य उमेश मुळीक, श्रीकांत वैजनाथ पाटील- सचिव मुख्याध्यापक.

        स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी केले. कार्यकारणीच्या पहिल्या सभेत शाळेसाठी आवश्यक बाबींचा आढावा घेऊन त्याच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करण्याचे ठरले. अमोल राजगोळकर यांनी आभार मानले. यावेळी अध्यापक गणपती लोहार, श्रीकांत आप्पाजी पाटील, उज्वला उज्वला नेसरकर, भावना आतवाडकर, कविता पाटील आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment