आसगाव माध्यमिक विद्यालयाकडून विश्वनाथ गावडे यांचा सत्कार करताना नागोजी गावडे, बी. बी. नाईक |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
आसगाव (ता. चंदगड) चे सुपुत्र आणि दाटे मराठी विद्या मंदिरचे अध्यापक विश्वनाथ विठोबा गावडे यांनी आपल्या ५० साव्या वाढदिवसानिमित्य गरीब ५० विद्यार्थ्यांच्या नावावर प्रत्येकी १ हजार प्रमाणे असे ५० हजारांच्या ठेव पावत्या देवून आपला वाढदिवस वेगळ्या पध्दतीने साजरा केला.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहून घर, समाज, मित्र परीवार आणि राजकारण सांभाळून एक यशस्वी हाडाचा शिक्षक म्हणून सतत मदत कार्यात मग्न असणारे विश्वनाथ विठोबा गावडे यांनी आपल्या 50 व्या वाढ दिवसानिमित्त गरीब आणि होतकरू मुलांना प्रत्येकी 1000 रु. ची मदत करून सामाजिक ऋण व्यक्त केले आहे. यामध्ये मराठी विद्या मंदिर आसगावच्या 20, आसगाव माध्यमिक विद्यालय आसगावचे 12 व दाटे मराठी विद्या मंदिर दाटेच्या 18 विद्यार्थ्यांना ही रक्कम दिली आहे. त्यांच्या या अनमोल कार्यानिमित्त आसगाव माध्यमिक विद्यालयाकडून बी. बी. नाईक, एन. एस. गावडे व आसगाव ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment