दौलतच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आंदोलनास पाठिंबा - चंदगड लाईव्ह न्युज

24 August 2022

दौलतच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आंदोलनास पाठिंबा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरटेड संचलित दौलत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आपल्या प्रलंबित न्याय मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाचा आजचा सहावा दिवस. सुद्धा चर्चेविनाच गेला. सर्व कामगारांनी आज ही कारखाना कार्यस्थळावर ठिय्या मांडला होता.  यावेळी कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ही उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.

           दरम्यान आयटक कामगार संघटनेचे पदाधिकारी कॉम्रेड अतुल दिघे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. सीटू संघटनेचे कॉम्रेड ए. बी. पाटील यांनी यावेळी कारखाना व्यवस्थापनावर चौफेर हल्ला चढविला. अथर्वचे व्यवस्थापन कामगार संघटनेबरोबर चर्चा करून तोडगा काढण्या ऐवजी कामगारांमध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र दौलतचे कामगार हे त्यागी आहेत. जे लोक त्याग करतात ते उठावही तेवढ्याच ताकदीने करतात. हा इतिहास आहे. त्यामुळे असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असे सांगितले. यावेळी आयटक संघटनेचे अतुल दिघे, प्रदीप पवार, नारायण तेजम, अशोक गावडे, गणेश फाटक, जे. जी. पाटील, गोविंद गावडे, एस. आर. पाटील, एस. के. पाटील, सुरेश सुतार, अरुण होंगल, चंद्रकांत बागडी यांनी मनोगते व्यक्त केली.

No comments:

Post a Comment