कॅन्सर प्रशिक्षणाचे प्रमुख मार्गदर्शक निलेश डोंगळे यांचे स्वागत करताना केंद्रप्रमुख शावेर फर्नाडिस, बंकट हिशेबकर, सौ. बागी |
अडकूर / सी. एल. वृत्तसेवा
अडकूर - आमरोळी केंद्राअंतर्गत अडकूर येथे कॅन्सर जनजागृती प्रशिक्षण केंद्र प्रमुख शावेर फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) येथे दोन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणाचे प्रमुख मार्गदर्शक नागपूरच्या प्रिव्हेंट कॅन्सर अभियानाचे निलेश डोंगळे आहेत.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन महादेव साळवे यांनी केले. यावेळी निलेश डोंगळे यानी प्रशिक्षणार्थिना कॅन्सरची सविस्तर माहिती दिली. तर तालूकास्तरीय भाषण स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त वैष्णवी कदम हिचा केंद्रप्रमुख शावेर फर्नांडिस व अलाबादेवी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. बागी यांच्या हस्ते पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला. या प्रशिक्षणात कु. वैष्णविने आपले विचार व्यक्त केले.
या प्रशिक्षणासाठी शिवशक्ती हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही.एन. सुर्यवंशी, महादेव नाईक (मलगेवाडी, उत्तम यमगेकर (आमरोळी), सौ. शुभांगी नाईक (आमरोळी) यांच्यासह अडकूर व आमरोळी केंद्रातील शिक्षक शिशिक्षा उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment