कोवाड महाविद्यालयात विर जवानांच्या कुटूंबियांचा गौरव प्रसंगी पो.निरिक्षक संतोष घोळवे व वीर जवानांचे कुंटूंबिय |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
सर्वोदय शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड (ता. चंदगड) येथे आजादी का अमृत महोत्सवानिमित्त शहीद जवानांच्या कुटंबाच्या वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांचा गौरव सोहळा बुधवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी महाविद्यालयात बी. आर. पाटील उपाध्यक्ष, सर्वोदय शिक्षण संस्था यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे पोलिस निरिक्षक संतोष घोळवे आणि संस्था पदाधिकारी प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक संतोष घोळवे म्हणाले, ``देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीर जवानांनी आत्मसपर्पण केले. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण अमृत महोत्सव साजरा करू शकलो. त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आजही आपले वीर जवान जीवाची पर्वा न करता देशाचे रक्षण करत आहेत. याच कार्यात असताना अनेक वीर जवान शहीद झालेले आहेत.
त्यांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे, आणि ऊर्जा मिळावी तसेंच त्यांचे कार्य सर्वांना आदर्श म्हणून तेवत राहावे, हा सन्मान करण्याचे भाग्य मला मिळाल्याबद्दल सर्व वीर जवानाच्या कुटूंबांना सलाम करून आपल्या वीर जवांनाच्या कार्याचा गोडवा गायला. यावेळी चंदगड, गडहिंग्लज, बेळगाव परिसरातील देशासाठी अनेकांनी हॊतात्म्य पत्करलेल्या या वीर जवानांच्या 15 कुटुंबाचा यथोचित गौेरव् सन्मान पो. नि. संतोष घोळवे यांच्या हस्ते मान चिन्ह शाल श्रीफळं आणि पुष्प गुच्छ देऊन करण्यात आला. वीर जवांनाच्या कुटूंबातील् वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, तसेंच कुटुंबातील, परिवारातील सदस्य उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषण बी. आर. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मोहन घोळसे तर आभार डॉ. ए. के. कांबळे, प्रास्ताविक डॉ. दीपक पाटील यांनी केले. स्वागत प्र. प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी केले. यावेळी शाहू फर्नांडिस, गोविंद प्रभू पाटील, बी. के. पाटील, याकूब मुल्ला, जोतिबा वांद्रे, नरसु बाचूळकर, नेसरकर मामा, सर्व शहीद जवानांचे नातेवाईक तसेंच सर्व विभागातील प्राद्यापक, सेवक, कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. बी. ए. भाग एकच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत गायले तर स्वागत गीत बी. कॉम. भाग एकच्या विद्यार्थिनींनी सादर केले.
No comments:
Post a Comment