दोडामार्ग येथे पणजी कोल्हापूर बस रस्ता सोडून खाली उतरली, रस्त्यावर आलेले आडवे झाड अपघातास कारणीभूत - चंदगड लाईव्ह न्युज

24 August 2022

दोडामार्ग येथे पणजी कोल्हापूर बस रस्ता सोडून खाली उतरली, रस्त्यावर आलेले आडवे झाड अपघातास कारणीभूत

दोडामार्ग तिराळी मार्गावर पणजी कोल्हापूर बस रस्ता सोडून खाली उतरली जेसीबी मशीन लावून बाहेर काढताना तर याच आडव्या आलेल्या झाडांमुळे अपघात झाला .ते व इतर झाडे बाजुला केली. (छाया तुळशीदास नाईक)


दोडामार्ग / सी. एल. वृत्तसेवा

    गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा येथील बसेस अपघात वाढत चालले असताना सोमवारी सायंकाळी पणजी येथून कोल्हापूर येथे जाणारी एस टी बस रस्त्यावर आडवे आलेले झाड आणि समोर आलेली दुसरी एस टी बस हिला बाजू घेताना एस टी बस रस्ता सोडून खाली उतरली केवळ झाडाला अडकून राहिली बस मधिल वीस प्रवाशांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. नतर जेसीबी मशीन लावून बस बाहेर काढली नंतर अपघाताला कारणीभूत ठरत असलेली आडवी झाडे बांधकाम विभाग यांनी तातडीने बाजूला केली.

      पणजी येथून कोल्हापूर येथे जाणारी एस टी बस दोडामार्ग येथे प्रवाशी घेऊन मार्गस्थ झाली असताना दिड किलोमीटर अंतरावर एका वळणावर समोर राधानगरी पणजी बस आली शिवाय आडवे आलेले झाड याला बस लागणार म्हणून एस टी बस चालकाने बस साईडपट्टीवर घेतली पण ही साईडपट्टी कमकुवत असल्याने बस चरात रूतली एका बाजूने कलंडली पण बाजूला असलेल्या झाडाला अडकून राहिली. त्यामुळे प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला.

     एस टी बस खाली गेली हे समजताच दोडामार्ग एस टी डेपो मधिल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नंतर जेसीबी मशीन लावून बस बाहेर काढली.नंतर नगराध्यक्ष चेतन चव्हाण, शिवसेना पदाधिकारी बाबुराव धुरी, समीर रेडकर, सरपंच लखु खरवत, यांनी प्रवाशांची विचारपूस केली नंतर  बांधकाम सहाय्यक अभियंता संभाजी बंडे यांना बोलावून दोनशे मीटर परिसरात आडवी आलेली झाडे तातडीने बाजूला करून रस्ता मोकळा केला.

   एस टी बस रस्ता सोडून खाली उतरली तो साईडपट्टी भाग तातडीने दगड टाकून मजबूत करावा जेणेकरून पुन्हा अपघात होऊ नये अशा सूचना चेतन चव्हाण यांनी बांधकाम विभाग यांना केल्या. दिड तासाने पणजी कोल्हापूर बस मार्गस्थ झाली.





No comments:

Post a Comment