यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

24 August 2022

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वृक्षारोपण

 


चंदगड/प्रतिनिधी :-- 

हलकर्णी ता.चंदगड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरूवर्य गुरूनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला . महाविद्यालयाच्या आवारामध्ये नुतन प्राचार्य डॉ . बी . डी . अजळकर , दौलत विश्वस्त संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील , उपाध्यक्ष संजय पाटील ,सचिव विशाल पाटील , प्रा . पी . ए . पाटील , डॉ . अनिल गवळी , प्रा . डॉ . राजेश घोरपडे , प्रा . यु . एस . पाटील , प्रशांत शेंडे इ . मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . या प्रसंगी एन . एस . एस . विभाग प्रमुख प्रा . जी . जे . गावडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य विविध उपक्रमाबददल माहिती दिली . एन . एस . एस . विभागातील स्वयंसेवक भैरव पाटील , कु.संजिवनी पाटील , कु.इंद्रायनी पाटील,हर्षद कांबळे , पृथ्वीराज पाटील , सुमित्रा पटेल इ . विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . कनिष्ठ विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रा.शाहू गावडे व प्रा.अंकुश नौकुडकर यांनी कार्यक्रमाचे आभार व संचलन केले . प्रशासकीय कर्मचारी सुजित पाटील व दिलीप पाटील यांचे सहकार्य लाभले .
No comments:

Post a Comment