पतसंस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार--आम.आबिटकर, चंदगड पतसंस्था कर्मचारी संघटनेचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

24 August 2022

पतसंस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार--आम.आबिटकर, चंदगड पतसंस्था कर्मचारी संघटनेचे उद्घाटन

चंदगड तालुका सहकारी पतसंस्था कर्मचारी संघटनेचे उद्घाटन व पतसंस्था सेवक कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा कार्यक्रम.

चंदगड/प्रतिनिधी :-- 

मायक्रो फायनान्स, खाजगी सावकारी, व इतर बेकायदेशिर पतपुरवठा करणाऱ्यां संस्थाकडून जनतेला लुटायचं काम सुरू आहे.हे सर्व थांबवण्यासाठी पतसंस्था  चळवळ अधिक गतिमान होण्यासाठी शासनाशी योग्य तो समन्वय साधून पतसंस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबध्द आहे . महाराष्ट्राच्या विधीमंडळात पतसंस्थांचा प्रतिनिधी नसल्यामुळेच पतसंस्थांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत . प्रत्येक विभागाचे प्रतिनिधी आपल्या आपल्या विभागाचे प्रश्न नेटाने मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न करीत असतात, भविष्यात पतसंस्थांचा प्रतिनिधीही विधीमंडळात कार्यरत राहिल , यासाठी प्रयत्न करू


अशी ग्वाही आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली . चंदगड तालुका सहकारी पतसंस्था कर्मचारी संघटनेचे उद्घाटन व पतसंस्था सेवक कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा या कार्यक्रमात ते बोलत होते . अध्यक्षस्थानी सदानंद आवटे होते . आमदार आबिटकर पुढे म्हणाले , जे का रंजले - गांजले त्यांची पतसंस्था , असे चित्र असून ठेवी गोळा करणे , कर्ज देणे , कर्मचारी सांभाळणे आदी उत्तरदायित्व पतसंस्थाना सांभाळून काम करावे लागते . राज्य सरकारचे निर्बंध आहेत.शासनाच्या कर्जमाफीचा लाभही पतसंस्थांना झाला नाही.यापुढे पतसंस्थांवर अन्याय होणार नाही , या दृष्टीने सहकार चळवळ वाढीसाठी प्रयत्न करूया . कोल्हापूर जिल्हा हे संपूर्ण राज्याचे सहकारात नेतृत्व करेल, असे काम आपल्याला करून दाखवायचे आहे,मायक्रो फायनान्स, खाजगी सावकारी, व इतर बेकायदेशिर पतपुरवठा करणाऱ्यां संस्थाकडून जनतेला लुटायचं काम सुरू आहे. आमदार राजेश पाटील म्हणाले , चंदगडची जनता उपकाराची जाणीव ठेवणारी असून तालुक्यात सहकार खऱ्या अर्थाने जीवंत आहे . भरमूअण्णांच्या पाठिंब्याने जिल्हा बँकेत बिनविरोध जाता आले . पतसंस्था कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून संरक्षण मिळविण्याबरोबरच पतसंस्थांमधील कर्मचाऱ्यांचे प्रश्न, निवडणुकीतील खर्च, आदी प्रश्नासाठी पाठपुरावा करू , असे आश्वासन दिले . प्रास्ताविक शांताराम हजगुळकर यांनी करून पतसंस्थांचे विविध प्रश्न मांडले . स्वागत शांताराम भिंगुडे यांनी केले.माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यानी   सहकारात बरेच दणके बसले असल तरी या क्षेत्रापासून दुर गेलो नाही.सहकारातील कार्य सुरूच आहे.पतसंंस्थांंमधील कर्मचाऱ्यांना नोकरीची शाश्वती नाही.ती त्याना मिळााली

पाहीजे.पतसंस्थांमुळे खाजगी सावकारीला मूठमाती मिळाल्याचे गोपाळराव पाटील यांनी स्पष्ट केले . यावेळी प्रमुख वक्ते डॉ .मयुरेश डंके यांनी मूळ भारतीय संस्कृतीच्या संवर्धनाचे आवाहन केले.तर रविंद्र देशपांडे यांनी मनातील भ्रम दूर करून स्वच्छंदी-आनंदी जीवन जगण्याचा मंत्र दिला . यावेळी जि.प.सदस्य सचिन बल्लाळ , बळीराजा शेतकरी संघटनेचे नितिन पाटील , अनिल पाटील , जर्नादन टोपले , सम्राट सनगर , सुधाकर पिसे , रमेशकुमार मिठारे , रंगराव पाटील,श्रीनिवास जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.नगराध्यक्षा प्राची काणेकर , शिवाजीराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या . सूत्रसंचालन दीपक माने यांनी केले.आभार सूर्यकांत पाटील यांनी मानले.यावेळी उपस्थित महिलावर्गासाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.



No comments:

Post a Comment