नेसरी पंचायत समिती मतदार संघातील हडलगे येथे १५ व्या वित्त आयोग फंडातून कचराकुंडीचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

23 August 2022

नेसरी पंचायत समिती मतदार संघातील हडलगे येथे १५ व्या वित्त आयोग फंडातून कचराकुंडीचे वाटप

पंचायत समिती १५ वा वित्त आयोग फंडातून कचराकुंडीचे वाटप करण्यात आले.

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

          नेसरी पंचायत समिती मतदार संघातील मौजे हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे विद्याधर बाबूराव गुरबे व इंदुताई नाईक यांच्या पंचायत समिती १५ वा वित्त आयोग फंडातून प्रत्येक घराघरात स्वच्छता संदेश देत कचराकुंडीचे वाटप करण्यात आले. 

          त्याचबरोबर आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी पालकमंत्री कोल्हापूर व विद्याधर गुरबे यांचे प्रयत्नातून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हडलगे गावच्या तलाठी चावडी साठी १७.५ लाखांचा भरघोस निधी मंजूर केला होता. या तलाठी चावडीच्या कामाचा शुभारंभ कार्यक्रम  हडलगे ग्रा.प. च्या ज्येष्ठ सदस्या सौ. सुधाताई प्रधान यांच्या हस्ते पाया खुदाई शुभारंभ झाला. यावेळी सरपंच सौ. लता प्रदिप पाटील यांचे अध्यक्षतेखाली विद्याधर गुरबे व सौ. इंदूताई नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत व सर्व ग्रा. पं. सदस्य, गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामसेवक श्री. कापसे, तंटामुक्त अध्यक्ष, कर्मचारी, ग्रामस्थ व महीला प्रमूख उपस्थित होते. 

       हडलगे गांव नेहमी आपल्या सोबत असल्याने यापुर्वीही माजी उपसरपंच अनिल पाटील यांनी व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी सुचविलेल्या विकास कामांना सतेज उर्फ बंटी पाटील यांचे सहकार्यातून व पंचायत समिती गडहिंग्लज यांचे माध्यमातून हडलगे गावांसाठी भरघोस निधी दिला असून यापुढेही हडलगे गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे श्री. गुरबे यांनी बोलताना सांगितले.

          या कार्यक्रमासाठी ग्रा‌. पं. सदस्य आण्णापा पाटील, आर. टी नाईक, सौ. आशा पाटील, सौ. कविता मोहीते, सौ. शरयू सुतार, सौ. विजया कुंभार, तंटामुक्त अध्यक्ष कल्लापा कडगांवकर, माजी सरपंच विष्णू पाटील, पांडूरंग बुगडीकटटीकर, दिपक पाटील माजी उपसरपंच,  सुभाष कांबळे माजी ग्रा. पं. सदस्य, बाळकृष्ण पाटील, गुलाब राठोड, भिमराव मोहीते, भरमू पाटील, शिवाजी कांबळे, अमोल मोहिते, उत्तम नाईक-हेब्बाळ जल, दुगूनवाडी सरपंच बाळू पाटील, रामचंद्र परीट-सदस्य ग्रा.पं. नेसरी, गुरुनाथ चव्हाण, युवक काँग्रेसचे पदाधिकारी नागेश दळवी, प्रदिप पाटील, अशोक कांबळे, सुधीर पाटील, तुकाराम पाटील, बेबीताई आंबेवाडकर, विमल पाटील, सुनंदा नेसरकर यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment