सातवणेत बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू, हलत्या देखाव्यासह आकर्षक विद्युत रोषणाई - चंदगड लाईव्ह न्युज

23 August 2022

सातवणेत बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू, हलत्या देखाव्यासह आकर्षक विद्युत रोषणाई

सातवणे येथे गणरायासाठी करण्यात येत असलेली सजावट

सातवणे / सी. एल. वृत्तसेवा

              दोन वर्ष कोरोना संकटामुळे गणेश उत्सव सणावर  शासनाचे निर्बंध घातले होते. यंदा शासनाने सर्व निर्बंध हटवल्यामुळे सर्व गणेश भक्त उत्साहाने कामाला लागले आहेत. दरवर्षी लाखो भाविक  सातवणे (ता. चंदगड) येथील  गणेशोत्सव देखाव्याना भेट देतात. त्यामूळे चालू वर्षी सर्व गणेश मंडळे हलत्या देखव्यासह आकर्षक विद्युत रोषनाई करण्याच्या कामामध्ये व्यस्थ आहेत.

         चंदगड तालुक्यातील  सातवणे सार्वजनिक तर सोडाच पण घरोघरी हालत्या देखाव्यासह मोठ्याआकाराच्या गणेश मूर्ती पाहावयास मिळतात. डोळ्याचे पारणे फेडणारी विद्युत रोषणाईमुळे दहा-बारा दिवस सारा गाव  उजळून निघतो. दोन वर्ष कोरोना च्या सावटाखाली गणेश उत्सवावर निर्बंध होते. त्यामुळे मोठ्या आकाराच्या मूर्ती व हालते देखावे साकारता आले नाहीत.  पण दोन वर्षाचा उत्साह यंदा एकाच वर्षी भरून काढण्यासाठी सर्वच गणेशभक्त तयारीला लागले आहेत. त्यासाठी गावामध्ये बालकापासून ते वयोवृद्धा पर्यंत देखावे उभे करण्याच्या कामात  व्यस्त आहेत. यासाठी त्याची तयारी अगोदरच पंधरा ते वीस दिवसापासून सुरू करण्यात आलेले आहे. गावामध्ये  श्री सिद्धिविनायक व अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ  अशी दोन मोठी मंडळे आहेत.  यांच्यामार्फत वीस ते तीस वर्षापासून द ऐतिहासिक, पौराणिक, आधुनिक, सामाजिक विषयावर संदेश देणारे देखावे साकारण्याचे कार्य केले जात आहे.  

          सातवणे गाव महाराष्ट्रात देखाव्यांचे गाव म्हणून ओळखू लागला आहे. गावामध्ये घरोघरी देखावे साकारण्यात येतात. गावामध्ये शेतकरी वर्ग असून दिवसभर शेतातील कामे करून रात्री उशिरापर्यंत आरासची तयारी करण्याचे काम चालू आहे.  दरवर्षी गणेशोत्सव काळात घरोघरी लाखो रुपये खर्च केले जातात. यंदा गणेश मुर्ती  आरासच्या सजावटीच्या साहित्यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कोरोनामुळे महागाई पण मोठया प्रमाणात वाडली आहे. तरी पण त्याचा विचार न कारता सजावत केली जात आहे. यावरून असे दिसते की हैसेला मोल नाही असे म्हणतात ते खरेच आहे. सातवणे गावातील लोकांची अनेकवर्षा पासूनची गणपती बाप्पा वरची श्रद्धा खूप आहे. म्हणूनच सातवणे गाव खूप जगावेगळ असे. 

         गावामध्ये सर्व जाती-धर्मा मध्ये एकोप्याचे दर्शन घडून येते. प्रत्येक घराघरात आकर्षक गणेश मूर्तीसह विधुत रोशनाई करण्यात येनार् आहे. शासनाने घालून  दिलेले सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. आतुरता लागलेली आहे, ती बाप्पाच्या आगमनाची. दोन वर्षाच्या कालखंडा नंतर ही देखावे साखारण्यात येणार आहेत. त्यामुळे उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. म्हणून सातवणेसारख्या गावामध्ये सिमाभागातील आजरा, गारगोटी, गडहिंग्लज, निपाणी, गोवा, बेळगाव, आशा अनेक भागातून भेट देत असतात. यंदाही मोठ्या प्रमाणात गणेश भक्त येथे भेट देऊन श्री चे दर्शन घेतील यात शंकाच नाही. 

         गावामधील दोन्ही मंडळाकडून जनजागृती, रक्तदान शिबीर वृक्षारोपण, सामाजिक शैक्षणिक उपक्रमात राबावण्यात येणार आहेत.  एकंदरीत संपूर्ण सातवणे गाव बाप्पाच्या तयारीत गुंतले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment