कुदनूर येथील राजीव गांधी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत मार्गदर्शन करताना चेअरमन पी बी पाटील.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील श्री राजीव गांधी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुदनुर या संस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २० ऑगस्ट रोजी खेळीमेळीत पार पडली.
कुदनूर येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन पी. बी. पाटील हे होते. स्वागत व प्रास्ताविक चेअरमन यांनी केले. अहवाल वाचन व्यवस्थापक यांनी केले. सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना चेअरमन पाटील व संचालक सुखदेव शहापूरकर यांनी समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी विविध विषयांवरील चर्चेत सभासदांनी सहभाग घेतला. दौलत कारखाना गुंतवणूकीवर पत्ताडे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर चर्चा होऊन सदर गुंतवणुकीची वसुली लवकरात लवकर करून घ्यावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले.
चर्चेत प्रकाश हेब्बाळकर, कृष्णा मांडेकर, सुरेश कुंभार, रुक्माणा गावडे, तानाजी पाटील, मारुती आंबेवडकर आदींनी भाग घेतला. सभासदांना यावर्षी पंधरा टक्के लाभांश देण्याचे तसेच मुख्य कार्यालय लवकरच नवीन वास्तुत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे यावेळी संचालक मंडळाने घोषित केले. सभेस उपसरपंच नामदेव कोकीतकर, उत्तम कोकितकर, विजया बाळासो कोकितकर, सर्व संचालक, शाखा सल्लागार, ठेवीदार, हितचिंतक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार आर. एस. देसाई यांनी मानले.
No comments:
Post a Comment