|
तहसिलदार यांना निवेदन देताना कामगार. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरटेड प्रा. लि. संचलित दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी चंदगड तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढला. प्रा. सुभाष जाधव यांनी कामगारांच्या मागण्याबाबतचे निवेदन तहसिलदार रणवरे यांना सादर केले. दरम्यान कामगार आयुक्त व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात सुसंवाद साधून प्रश्न मार्गी लागावा, यासाठी चंदगड तहसील कार्यालयात शुक्रवार दि. २६ रोजी सायंकाळी ३ वाजता बैठकीचे आयोजन तहसीलदार विनोद रणवरे यांनी मोर्चानंतर जाहीर केले. चंदगड तालुका साखर कामगार युनियनमार्फत हा मोर्चा काढण्यात आला.
|
मोर्चात बहुसंख्येने सहभागी झालेले कामगार.
|
सकाळी अकरा वाजता दौलतचे अंदोलन कर्ते कामगार माडखोलकर महाविद्यालय येथे जमले. मोर्चाला सुरुवात झाली. धर्मवीर संभाजी चौक, कॅफे कैलास कॉर्नर, रवळनाथ देवालय, न्यायालयमार्गे मोर्चा तहसील कार्यालयाकडे आला. पावसाची तमा न बाळगता कूच केली. तहसील कार्यालयासमोर भूमिका मांडाताना युनियन (सिव) चे अध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष जाधव म्हणाले, कामगारांच्या मागण्याबाबत अथर्व व्यवस्थापनाने युनियनशी चर्चा करून निर्णय करावा, यासाठी गेली दोन वर्षे पाठपुरावा करूनहीप्रतिसाद मिळाला नाही. व्यथा असह्य झाल्याने १ ९ ऑगस्टपासून संप सुरू केला आहे. चर्चेतून प्रश्न सोडविण्यासाठी कामगार तयार असतानाही व्यवस्थापन चर्चा करायला तयार नाही. दौलत सुरू व्हावी, यासाठी शेतकरी व सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिला. २०११ च्या पगारावर कामगार काम करतात . तरीही यावर्षी ५ लाख ३९ लाख टन उसाचे गाळप झाले. हक्कासाठी आवाज उठविणाऱ्यांची लांब बदली केली जाते. कामगाराना अध्यक्ष शिविगाळ करीत असून त्यांची भाषाही उर्मट आहे. काही कामगारांनी स्वेच्छेने मार्च २०२२ पर्यंत पगारातील कपात स्वीकारलेली होती. मात्र तीही १ एप्रिलपासून देणे अपेक्षित असताना दिली जात नाही. व्यवस्थापनाने शेतकऱ्यांचे २४ कोटी आणि कामगारांचे ३० कोटी रुपये देणे असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी दौलतच्या कामगारांच्या पाठिशी शिवसेना सदैव असून चंदगडकर एकदा पेटले की कुणाच्या बापाला ऐकत नाहीत, हे एव्हीएच आंदोलनात दिसलेले आहे, कारखाना चांगला चाललेला असतानाही कामगारांना त्यांच्या घामाचे पैसे देण्यात व्यवस्थापनाने चालविलेली चालढकल सहन होणारी नाही. शिवसेना कामगारांना न्याय मिळवून देण्यात प्रा. सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल, अशी ग्वाही दिली. यावेळी युनियनचे खजिनदार प्रा. आबासाहेब चौगुले, जनरल सेक्रेटरी प्रदीप पवार, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर, धुमडेवाडीचे माजी पोलीस पाटील सुभाष पाटील, प्रा. दीपक कांबळे, माजी जि. प. सदस्य बाबुराव हळदणकर, महादेव फाटक, रणजित पाटील, जानबा चौगुले आदीनी कामागारांच्या व्यथा मांडून कामगारांच्या पाठिशी राहण्याची ग्वाही दिली. यावेळी तालुक्यातील विविध संघटनांनी दौलत कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
No comments:
Post a Comment