चंदगड विधानसभा मतदारसंघात शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची सभासद नोंदणी सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2022

चंदगड विधानसभा मतदारसंघात शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची सभासद नोंदणी सुरू

शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची सभासद नोंदणी सुरू. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             चंदगड विधानसभा मतदारसंघात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या सभासद नोंदणी ला चंदगड तालुक्यात सुरवात झाली. तडशिनहाळ फाटा (ता. चंदगड) येथील संपर्क कार्यालयात सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. 

         यावेळी तालुका प्रमुख कल्लापान्ना निवगीरे व माजी तालुका प्रमुख दिवाकर पाटील म्हणाले ``चंदगड विधानसभा मतदारसंघात २५ हजार सभासद नोंदणी करून मुख्यमंत्री शिंदे गटाचे विचार गावा गावात पोहचवणार असल्याचे यावेळी सांगितले.पहिल्याच दिवशी २००० विक्रमी सभासद नोंदणी झाली आहे. या कार्यक्रमाला उपतालुका प्रमुख किरण कोकीतकर, दत्ता पाटील, विभाग प्रमुख विनोद पाटील, बंडू गुडेकर, सलमान शेख, रघुनाथ पाटील, तुळशीदास जोशी, मिथुन पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment