चंदगड तालुक्यातील बांधकाम कामगारांना सुरक्षा कीटचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2022

चंदगड तालुक्यातील बांधकाम कामगारांना सुरक्षा कीटचे वाटप

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यातील बांधकाम कामगारांना सुरक्षा कीट, अत्यावश्यक सेवा संचाचे वाटप करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष कल्लापान्ना निवगीरे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील विझंणे, चंदगड, ढेकोळी, सुळये, हाजगोळी, कोनेवाडी या गावातील ७० बांधकाम कामगारांना सुरक्षा कीट, अत्यावश्यक सेवा संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष निवगीरे म्हणाले ``संघटनेच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील गावा गावातील व वाड्या वस्तीवर रहाणाऱ्या बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची कमीत कमी फी मध्ये नोंदणी करून त्यांना सर्व योजनेचा लाभ दिला जात आहे. आज पर्यंत कमीत कमी फी घेऊन नोंदणी करणारी तालुक्यातील एकमेव संघटना आहे. म्हणून बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार तडशिनहाळ फाट्यावरील कार्यालयाशी भेट देऊन आपली नोंदणी करून घेऊन सर्व योजनांचा लाभ मिळवून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment