बुक्कीहाळ खुर्दचे सुपुत्र उत्तम बिर्जे यांची भारतीय सैन्य दलात नायब सुभेदार पदी नियुक्ती - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2022

बुक्कीहाळ खुर्दचे सुपुत्र उत्तम बिर्जे यांची भारतीय सैन्य दलात नायब सुभेदार पदी नियुक्ती

उत्तम बिर्जे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           बुक्कीहाळ खुर्द (ता. चंदगड) येथील सुपुत्र उत्तम बिर्जे यांची भारतीय सैन्य दलात नायब सुभेदार पदी नियुक्ती झाली आहे.

          उत्तम बिर्जे हे भारतीय सैन्य दलात बेळगाव येथून १४ मराठा रेजिमेंट मध्ये २००३ साली भरती झाले. तसेच उत्तम यांचे वडील ज्योतिबा बिर्जे हे देखील भारतीय सैन्य दलात २२ वर्ष सेवा बजावून निवृत्त झाले आहेत. तसेच उत्तम यांचे लहान भाऊ संदेश बिर्जे हे देखील सैन्य दलात लान्सनायक या पदावर कार्यरत आहेत. बुक्कीहाळ सारख्या डोंगराळ भागातून उत्तम बिर्जे यांनी केलेली कामगिरी ही कौतुकास्पद असल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment