सांगाती पतसंस्थेची वार्षिक सभा |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
शिनोळी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीतील सांगाती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण संस्थाध्यक्ष हिरामणी कृष्णा तुपारे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संप्पन्न झाली. सर्व प्रथम संस्थेचे ज्येष्ठ सभासद काळू परसू नेवगिरे, कृष्णा पाटील, उत्तम मुरकुटे, शिवाजी गुंडू खांडेकर, हरीबा रामचंद्र सुतार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष नितीन पाटील यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करून अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासद, हितचिंतक, सामाजिक, शैक्षणिक व राजकिय क्षेत्रातील व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. संस्थेचे अध्यक्ष हिरामणी तुपारे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या सांप्पत्तिक स्थितीची व वाटचाली विषयी माहिती दिली. देवून संस्थेच्या विकासासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानून संस्थेला अहवाल सालात रु ५३ लाख १५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे सांगून १५ % लाभांश जाहिर केला.
सर्व सभासदांनी नजीकच्या शाखेतून लाभांश घ्यावा अशी विनंती केली.संस्थेच्या आर्थिक पत्रकांचे वाचन संस्थेचे सचिव गावडू पाटील यांनी केले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बाबुराव आप्पाजी नेसरकर यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत माहिती देवून संस्थेच्या प्रगतीसाठी कारणीभूत सर्व सभासद, संचालक, ग्राहक, हितचिंतक, सेवक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संस्थेला झालेल्या निव्वळ नफ्याची विभागणी सभेसमोर सादर केली. यावेळी संस्थेचे सभासद नारायण राणबा पाटील यांनी संस्थेला अहवाल सालात ५३ लाख १५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याने संस्थेच्या संचालक मंडळाचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला असता उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात संचालक मंडळाचे अभिनंदन केले. यावेळी कृष्णा पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला . सभेला संस्थेचे संचालक, माजी अध्यक्ष सतीश सावंत, मोनाप्पा पाटील त्याचबरोबर अनंत सदावर, दयानंद लांडे, मारुती भोगण, हणमंत गाडीवडर, सुरेश सुतार, संचालिका अस्मिता करटे, राजश्री पाटील तसेच शाखाध्यक्ष दयानंद सलाम, शरद पाटील यासह परशराम गणपती पाटील, मष्णू कांबळे, डॉ. मधुकर जाधव, बाळकू फर्नांडीस, अनंत नेसरकर, नारायण कोकीतकर, देवाप्पा खांडेकर, कृष्णा विठ्ठल बोकमूरकर, मनोहर भोगण यासह सभासद, सेवक उपस्थित होते. चंदगड शाखाध्यक्ष प्रा. एच. के. गावडे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment