चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये भरली 'बाप्पांची शाळा, प्रत्यक्ष कृतीतून दिले पर्यावरण शिक्षण - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2022

चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये भरली 'बाप्पांची शाळा, प्रत्यक्ष कृतीतून दिले पर्यावरण शिक्षण

चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरवलेली 'बाप्पांची शाळा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          लोकमान्य टिळकांनी एका उदात हेतूने सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरवात केली होती. पण अलिकडे गणेश उत्सवाला वेगळेच वळण मिळाले आहे. रासायनिक रंग, प्लास्टर ऑफ पॅरीस पासून बनविलेल्या मूर्तीपासून मोठया प्रमाणात प्रदूषण होत आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. याची जाणीव विद्यार्थ्याना व्हावी म्हणून  दि न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य आर पी. पाटील यांनी इको फ्रेंडली गणपती बाप्पा हा उपक्रम राबविला. यामध्ये पाचवी ते दहावीच्या बासष्ट मुलांनी सहभाग नोंदवला. माती, शेडू, कागदी लगदा, पीठ यापासून विद्यार्थ्यांनी आकर्षक मूर्त्या बनविल्या. रासायनिक रंगाऐवजी हळद, मुलतानी माती, गोरूचा इ. नैसर्गिक रंगाचा वापर मुलांनी केला.या प्रदर्शनाचे उद्घाटन विनायक पिळणकर यांच्या हस्ते झाले.

           यावेळी प्रा. एन. एस. पाटील यांनी विद्यार्थ्याना अनेक उदाहरणे देऊन पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचे महत्व पटवून सांगितले. बालगोपाळांनी तयार केलेल्या गणपतीच्या इको फ्रेंडली मूर्त्यांची पहाणी करून त्यांनी प्रत्येकाशी सवांद साधला.

            दि न्यू इंग्लिश स्कूलने पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून राबवलेल्या या पर्यावरण पूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धेत मोठ्यागटात अनुक्रमे तन्मय जुवेकर, धनंजय गावडे, तन्मयी गावडे, धीरज पाथरवट, कुशाल हिरेमठ तर लहान गटात कावेरी चांदेकर, निधी पाटील, हर्षद बामणे, खुशी गावडे, आर्या निळकंठ यांनी क्रमांक पटकावले. परीक्षक म्हणून व्ही. के. गावडे, प्रा. ए. डी. धायगुडे, प्रा. एस. एम. निळकंठ यांनी काम पाहिले.

            या उपक्रमासाठी प्रा. एम. एम. आमणगी, बी. आर. चिगरे, व्ही. के. गावडे, टी. एस. चांदेकर, टी. टी. बेरडे, एस. जे. शिंदे, टी. व्ही. खंदाळे, विद्या डोंगरे, विद्या शिंदे, जे. जी. पाटील, वर्षा पाटील, शरद हदगल, रवि कांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय साबळे यांनी तर आभार एम. व्ही. कानूरकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment