चंदगड तालुक्यात हत्तींचे आगमन, हत्तीच्या कळपाने ऊस, भात, केळीचे नुकसान, हजारोंचे नुकसान, बंदोबस्ताची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2022

चंदगड तालुक्यात हत्तींचे आगमन, हत्तीच्या कळपाने ऊस, भात, केळीचे नुकसान, हजारोंचे नुकसान, बंदोबस्ताची मागणी

हत्तीने जमीनदोस्त केलेली केळी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

              वाघोत्रे (ता. चंदगड) येथील मारुती तुकाराम गावडे या शेतकऱ्यांच्या भात व केळी आदी पिकाचे हत्तींच्या कळपाने नुकसान केले आहे. परिसरात हत्ती दाखल होताच येथील ग्रामस्थांनी वनविभागाला फोन करून हत्तीचा कळप दाखल झाल्याची वर्दी दिली. हत्तीच्या कळपात एक टस्कर हत्ती, एक मादी हत्ती आणि दोन पिल्ले असा चार हत्तींचा कळप असून यांचा वावर सध्या गुडवळे, वाघोत्रे, हेरे परिसरात असल्याने येथील शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी. 

हत्तीच्या पायामुळे भातपिकांचा झालेला चिखल

           त्यामुळे परिसरातील नागरिक संतापले. हत्ती, गविरेडे यांचा नित्यनेमाने त्रास येथील शेतकऱ्यांना भोगावा लागतो. याकरिता जंगल परिसरातीलचरी मारून वाट अडवली जाते. पण त्या घरी जंगलातील पावसाच्या पाण्यामुळे भरून जातात व तिथूनच हती परिसरात प्रवेश करतात.  यासाठी वनविभागाने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. पण या बाबीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. तुटपुंजी नुकसान भरपाई मिळते, मात्र होणारे नुकसान प्रचंड असते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम वनविभागाकडून केले जात आहे. 

            तुटपुंजी नुकसान भरपाई मिळते मात्र होणारे नुकसान प्रचंड असते. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित बिघडत असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम वनविभागाकडून केले जात आहे. शासकीय काम आणि नुकसान भरपाई वेळेत न मिळाल्याने येथील शेतकरी मेथाकुटीला आला आहे. ऐन गणपतीच्या सणात हत्तीच्या कळपाने आगमन वाघोत्रे, गुडवळे परिसरात हती दाखल झाल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी आपण वन विभागाकडे सोलर कुंपण मागणी केली आहे. पण वनविभागाकडून पूर्तता झाली नसल्याचे सरपंच संतोष गावडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment