सामंजस्यपणाने दौलत-अथर्वच्या कामगार संपावर तोडगा निघेल - चेअरमन मानसिंग खोराटे - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2022

सामंजस्यपणाने दौलत-अथर्वच्या कामगार संपावर तोडगा निघेल - चेअरमन मानसिंग खोराटे

मानसिंग खोराटे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व संचलित दौलत साखर कारखान्यातील कामगारांचा संप नेमका कशासाठी? कामगारांच्या मागण्यांचा प्रश्न हा अंतर्गत असून त्यावर कामगार आणि कारखाना प्रशासन एकत्र बसून तोडगा निघू शकतो. यामध्ये मलाच बदनाम का केलं जात आहे? माझ्याबद्दल अपप्रचार का? असा प्रश्न अथर्व दौलत कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी उपस्थित केला आहे. कामगार मागतात ते आम्ही द्यायला तयार आहोत. या आधीच मागण्या मान्य झाल्या असत्या मात्र, कामगार युनियनमधील वाद आणि काही लोकांच्या अहंकारामुळे हा प्रश्न चिघळला असून कारखान्याची नाहक बदनामी होत असल्याचे खोराटे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

            अथर्व जिल्ड दौलत साखर कारखान्याचे कामगार संपावर असून त्यांनी परवा आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी भर पावसात तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. पगारवाढ, कपात बंद करावी अशा मागण्या केल्या असून त्यावर गेले आठवडाभर संप सुरू आहे. त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. यावर शुक्रवारी जिल्ह्यधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. याबाबत बोलताना श्री. खोराटे यांनी कामगार युनियनच्या भांडणात हा प्रश्न रखडला असून न्यायालयाच्या आदेशाला आपण बांधील असून त्याचा कुठेही अवमान होवू नये. यासाठी ही बोलणी थांबली असून त्यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा करायला तयार आहे. कामगार संघटनेने न्यायालयात दाखल केलेले दावे मागे घेतल्यानंतर, यावर २४ तासात तोडगा निघेल अशी भूमिका मांडली.

No comments:

Post a Comment