घरगुती सार्वजनिक गणेशमूर्ती दान करा, नगराध्यक्ष प्राची काणेकर यांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2022

घरगुती सार्वजनिक गणेशमूर्ती दान करा, नगराध्यक्ष प्राची काणेकर यांचे आवाहन


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            चंदगड नगरपंचायत हद्दीतील नागरीकांनी गणेश विसर्जन दिवशी घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती दान कराव्यात असे आवाहन चंदगड नगराध्यक्ष प्राची काणेकर यांनी आवाहन केले आहे. 

            गुरुवारी (ता. २५) नगराध्यक्ष प्राची काणेकर यांचे अध्यक्षतेखाली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष व शहरातील कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी गणेशोत्सव काळात प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करणेत यावी. अनधिकृत बँनर / होर्डिंग लावण्यात येऊ नये. नगरपंचायतीची परवानगी घेऊनच करणेत यावे. गणेशोत्सव काळात शासनाच्या सूचनांचे पालन करणेत यावे. गणेशोत्सव सोहळा शांततेत सदभावना पूर्वक साजरा करणेत याव, अशा सूचना करणेत आल्या. यावेळी उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक, मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते, नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी आशुतोष प्रधान यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment