अथर्व व्यवस्थापन व कामगार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी संयुक्त बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2022

अथर्व व्यवस्थापन व कामगार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी संयुक्त बैठक

दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड संचलित दौलत साखर कारखान्याच्या कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा काढण्यासाठी  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथे शुक्रवार दि.२६ रोजी सायंकळी पाच वाजता आयोजित केली आहे. दौलतच्या कामगारांचे थकीत वेतन व इतर मागण्याबाबत आंदोलन सुरू आहे. या आंदोलना कोल्हापूरचे  विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) ए. व्ही. गाडे यांनी याबाबत दौलतचे अध्यक्ष अशोक जाधव, अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, दौलत साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सुभाष जाधव, सचिव प्रदीप पवार आदी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

No comments:

Post a Comment