अडकूर कॉलेजमध्ये ई-पीक नोंदणी प्रशिक्षण संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2022

अडकूर कॉलेजमध्ये ई-पीक नोंदणी प्रशिक्षण संपन्न

नागनवाडी मंडल अधिकारी देविदास तारडे इ- पिक योजना नोंदणीची माहिती देताना.


अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

          येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने ई-पीक नोंदणी बाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्य शासनाने जनजागृती मोहीमेला सुरवात केली आहे. आज नागनवाडी सज्यातील  मंडल अधिकारी देविदास तारडे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी होते.

        यावेळी बोलताना ते म्हणाले, ``शासनाने केलेल्या या अवाहनाला प्रतिसाद द्यावा तसेंच आपल्या शेतकरी बांधवाना शेतीविषक ऑनलाईन माहिती भरण्यासाठी विद्यार्थ्यानी  मदत करावी.  शासन स्तरापर्यंत सर्व माहिती पोहचवण्यासाठी सर्वानी दक्ष रहावे. याबरोबरच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवावण्यासाठी त्याना मदतिचा हात देण्याचे आवाहन मंडल अधिकारी श्री. तारडे यानी केले. यावेळी प्रा. रामदास बिर्जे यानी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. व्ही. पी. पाटील यांनी केले. तर आभार प्रा. एम. पी. पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment