मराठा लाईट इंफंट्री रेजिमेंटल सेंटरच्या जवानांनी लुटला दही हंडीचा आनंद - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2022

मराठा लाईट इंफंट्री रेजिमेंटल सेंटरच्या जवानांनी लुटला दही हंडीचा आनंद

दही हंडीचा आनंद लुटताना जवान.

बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा

           देशाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असणाऱ्या मराठा लाईट इंफंट्री रेजिमेंटल सेंटरच्या जवानांनी देखील श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त दही हंडीचा आनंद लुटला. अतिशय उत्साही वातावरणात दही हंडी कार्यक्रम पार पडला.

          भारतीय लष्कर हे जगातील उत्कृष्ट लष्करापैकी एक म्हणून ओळखले जाते. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे आम्ही जतन केले पाहिजे. अशा सण आणि उत्सवामुळे आपण एकत्र येतो.आपण सगळे एका मोठ्या कुटुंबाचा भाग आहोत अशी भावना सण आणि उत्सवामुळे निर्माण होते असे उदगार मराठा लाईट इंफंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी दही हंडी कार्यक्रम प्रसंगी बोलताना काढले.

            मराठा सेंटरमध्ये आयोजित दही हंडी कार्यक्रमाला जवान,अधिकारी यांचे कुटुंबीय आणि बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दही हंडी स्पर्धेतील विजेत्याला ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. दरवर्षी विविध सण आणि उत्सव मराठा सेंटरमध्ये उत्साहाने साजरे केले जातात. दही हंडी स्पर्धेच्या वेळी तर जवानांचा आणि अधिकाऱ्यांचा उत्साह आणि जोश यांचे दर्शन घडते.

No comments:

Post a Comment