जगण्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा - संजय साबळे, चंदगड पंचायत समितीमध्ये आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

10 August 2022

जगण्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा - संजय साबळे, चंदगड पंचायत समितीमध्ये आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम

`आझादी का अमृत महोत्सव`` या उपक्रमातर्गत चंदगड पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत बोलताना संजय साबळे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

              "जगण्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे. जीवनाकडे रसिक दृष्टीने, खेळकर वृत्तीने बघितल्यास जगणं सुंदर होतं. इतरांचे जगणे सुंदर करण्यासाठी प्रयत्न कराल तरच स्वतःचे जगणे सुंदर व आनंदी होईल. " असे प्रतिपादन दि न्यू इंग्लिश स्कूलचे अध्यापक संजय साबळे यांनी केले.

         `आझादी का अमृत महोत्सव`` या उपक्रमातर्गत चंदगड पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत 'जगणे सुंदर आहे' या विषयावर संजय साबळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे होते.

          "जीवनाचाआनंद सुगंधा प्रमाणे दरवळायचा असल्यास चंदनाप्रमाणे झिजावे लागते. संकुचित वृती सोडल्यास आनंदी जीवनाचा मार्ग सापडतो." असे मत संजय साबळे यांनी मांडले. कार्यक्रमाला चंदगड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अधिकारी सुमन सुभेदार, वनपाल पी. एस. भोसले, व्ही. एन. पारधी, के. ए. पाटील, के. झेड. कोठीवाले, आर. के. जरळी उपस्थित होते. आभार संजय चंदगडकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment