कामेवाडी येथे जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन" उत्साहात साजरा करण्यात आला. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कामेवाडी (ता. चंदगड) येथे ९ आॕगष्ट "जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन" मोठ्या उत्साहाने कामेवाडी येथील ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच व त्यांचा कार्यालयीन स्टाफ, सर्व सदस्य, कोळीमहादेव जमातीचे बंधुभगिनी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.
यानिमित्त शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ, ग्रामसेवक, तलाठी यांच्या उपस्थितीत गावातून रॕली काढण्यात आली. सरपंच यांच्या हस्ते आदिवासी क्रांतीकारक यांच्या प्रतिमांना पूष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. त्यांनी आपल्या गावात कोळीमहादेव जमातीचे आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात पुर्वापार रहात असून ते अनुसूचित जमातीच्या लाभासाठी पात्र असल्याचे नमुद केले. त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण निर्विवाद व निर्णायक प्रयत्न अखेरपर्यंत करणार आहे.
हर हर महादेव, राघोजी भांगरे, डाॕ. आंबेडकर यासह आदिवासी जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. आदिवासी दिनाची संकल्पना व महत्त्व याची सविस्तर माहिती मारुती व्हंकळी यांनी सांगितले.यावेळी आदिवासी पोलिस पाटील सौ. मुत्नाळे, जेष्ट आदिवासी शिवाजी व्हंकळी, श्री. शिरगे, परशराम पाटील, बसवाणी पाटील यांच्यासह आदिवासी महिला, शालेय मुले-मुली उपस्थित होते. सुत्रसंचालन बाळू पाटील यांनी केले. तंटामुक्त कमिटी अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment