भाषा हे सामाजिक धन असल्याने त्याची निष्ठेने जपणूक होणे आवश्यक - प्राचार्य डॉ. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2022

भाषा हे सामाजिक धन असल्याने त्याची निष्ठेने जपणूक होणे आवश्यक - प्राचार्य डॉ. पाटील

बोलताना प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         "भाषेच्या विद्यार्थ्याने श्रवण, भाषण, लेखन, वाचन या मूलभूत कौशल्यांचा विकास करावा. भाषिक देवाण-घेवाण वृद्धिंगत करणे आवश्यक आहे. भाषेमुळे माणूस माणसाशी जोडला जातो. भाषा हे फार मोठे सामाजिक धन असून त्याची निष्ठेने जपणूक करायला हवी. "असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी केले. 

        ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील मराठी व हिंदीभाषेच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभात बोलत होते. प्रा. एस. एन. पाटील प्रास्ताविकात म्हणाले" विद्यार्थ्यांनी ज्ञानग्रहण करण्यासाठी आपली सारी ज्ञानेंद्रियांची कवाडे सदैव खुली ठेवावीत. प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी आपली भाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी ती समृद्ध करणे गरजेचे आहे. भाषेच्या विद्यार्थ्यांनी परंपरेचा समृद्ध वारसा जतन करावा. नव्या नव्या शब्दांचा स्वीकार करताना आपली भाषा अधिक प्रगल्भ बनवण्यावर भर द्यावा. भाषा ही माणसाची अपरिहार्य ओळख असते असे सांगितले.

            वैशाली गावडे, सानिका तळेवाडी, निकिता गावडे, तेजस्विनी तुपट या विद्याथिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. जी. वाय. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आर. ए. कमलाकर यांनी आभार मानले. यावेळी  मराठी व हिंदी विभागातील विद्यार्थी  उपस्थित होते.



No comments:

Post a Comment