होसूर पुलावरून कार कोसळली, कुदनूरच्या सुरेश घाटगेसह चालक बालंबाल बचावले - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2022

होसूर पुलावरून कार कोसळली, कुदनूरच्या सुरेश घाटगेसह चालक बालंबाल बचावले

 

होसूर : पुलावरून खाली कोसळलेली कार.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

       होसूर (ता. चंदगड) ते बुक्किहाळ या  दरम्यान  ओढ्यावरील पुलावरून शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता कार कोसळली, मात्र या घटनेत कारमध्ये असणारे दोघेही बालंबाल बचावले आहेत. 

     मुळचे कुदनूर व सध्या वडगाव (बेळगाव) येथील दादा डेव्हलपर्सचे संचालक व बांधकाम व्यवसायिक सुरेश घाटगे व त्यांचे चालक शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी 6 वा. कोवाड येथून आपले काम संपून बेळगावच्या दिशेने जात होते.  यावेळी कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार उजव्या बाजूला जाऊन  पुलावरील कठड्याचा शेवटचा काही भाग तुटून कार खाली पडली. मात्र या कारमध्ये असणारे सुरेश घाटगे व त्यांचे चालक या दोघांना सुदैवाने इजा झाली नाही. 

     रात्री उशिरापर्यंत सदर कार ओढ्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. कार उंचावरून खाली पडून दोघेही सुदैवाने बचावले आहेत. देव तारी त्याला कोण मारी, असाच प्रकार येथे घडल्याची परिसरात चर्चा सुरू आहे. रात्री दहा नंतरही कार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.No comments:

Post a Comment