चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
वाचन हा एक छंद आहे तो जोपासला तर सुखी जीवनाचा मार्ग सापडेल. अनेक संकटावर मात करण्याच्या वाटा वाचनाच्या महामार्गावर सापडतात. जगणं समृद्ध करण्याचा मार्ग म्हणजे वाचन होय. असे प्रतिपादन यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे डॉ. एन. टी. मुरकुटे यांनी केले.
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत आयोजित इयत्ता दहावी परीक्षेतील मराठी विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व मराठी विषय शिक्षक सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. मुरकुटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य एम. एम. गावडे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय साबळे यांनी केले. पाहुण्यांची ओळख सीमाकवी रवी पाटील यांनी करून दिली. प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले शालेय समितीचे अध्यक्ष एम. एम. तुपारे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षक सुरेश सातवणेकर, डी. ए. सातर्डेकर, ए. झेड. गावडे, पी. बी. चौगुले, सतिश बोकडे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, माजी प्राचार्य आर. आय. पाटील यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. तर मराठी विषयात ९६ पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या तालुक्यातील पंधरा विद्यार्थ्यांचा गौरव चिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले.
यावेळी एम. एम. शिवणगेकर, टी. टी. बेरडे, एस. एल. बेळगावकर, एम. टी. कांबळे, आर. आय. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला पत्रकार नारायण गडकरी, महादेव भोगुलकर, सुरेश तुर्केवाडकर, जी. व्ही. गावडे, एस. पी. पाटील, व्ही. एल. सुतार, एस. पी. मोहनगेकर, सुरेश नाईक, पी. के. पाटील, डी. एस. धुमाळे, श्री. देसाई उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एच. आर. पाऊसकर यांनी तर आभार बी. एन. पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment