सरवडे येथे रविवारी मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षांची जिल्हा स्तरीय बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2022

सरवडे येथे रविवारी मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षांची जिल्हा स्तरीय बैठक



चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         कोल्हापूर जिल्हा मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षांची मासिक बैठक रविवार दि. ०७ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी २.३० ते ५.३० वाजता राम कृष्ण मल्टीपर्पज हॉल, (सरवडे कमानीच्या विरुद्ध बाजूस)  निपाणी- राधानगर रोड, सरवडे,  ता. राधानगरी''  येथे आयोजित केल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर, कुरुंदवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

      बैठकीच्या ठिकाणी मराठा सेवा संघ, कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीचीही बैठक होणार आहे. मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीने निर्देशानुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी घेण्यात येणारी जिल्ह्यातील ही सलग सहावी संयुक्त बैठक आहे. 

         कामाची प्रगतीची दिशा ठरविणेकामी बैठक महत्त्वाची आहे. तसेच सभेचे ठिकाण हे राधानगरीसह भुदरगड, करवीर, कागल, गडहिंग्लज, आजरा व चंदगड  तालुक्याकरिता मध्यवर्ती असल्याने या सर्व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, हितचिंतक समाज बांधव-भगिनी यांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment