बेळगावातील जाधव नगर परिसरात बिबट्याने बांधकाम करणाऱ्या गवंड्यावर हल्ला केल्याने परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
दुपारच्या वेळी जाधव नगर येथे घराचे बांधकाम करत असणाऱ्या सिद्राय लक्ष्मण निलजकर (वय-३८, रा. बेळगाव) यांच्यावर बिबट्याने मागच्या बाजूने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे तो खाली पडला. बिबट्याने त्याच्या पंजाने हल्ला केल्यामुळे सिद्राय हा जखमी झाला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे खाली पडलेल्या सिद्रायवर पंजाने बिबट्याने हल्ला करून जखमी केले. यावेळी अन्य लोकांनी आरडाओरड करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बिबट्या धावणाऱ्या अन्य लोकांच्या मागे धावत गेला.
लोकवस्तीत बिबट्याचा वावर दिसून आल्यामुळे वन खात्याचे कर्मचारी, पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. गदग येथून बिबट्या जेरबंद करण्यासाठी विशेष पथक बेळगावात दाखल झाले आहे. बिबट्याचा वावर असणाऱ्या भागात बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. जाधव नगर परिसरातील सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासले असता त्यामध्ये बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिबट्या जेरबंद करण्याची मोहीम वन आणि पोलीस खाते संयुक्तपणे राबवत आहेत.
No comments:
Post a Comment