'संत गजानन 'पॉलिटेक्निकचा ९५ टक्के निकाल, नेहा कुलकर्णी कॉलेजमध्ये प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2022

'संत गजानन 'पॉलिटेक्निकचा ९५ टक्के निकाल, नेहा कुलकर्णी कॉलेजमध्ये प्रथम


महागाव / सी. एल. वृत्तसेवा

         महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुरल पॉलीटेक्निकचा निकाल ९५ टक्के लागला. एम. एस. बी. टी. ई. ने मे २०२२ मध्ये ही परिक्षा घेतले. कॉलेजमध्ये द्वितीय वर्ष कॉम्प्युटर विभागाची नेहा कुलकर्णी ९३.६० टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. 

       विभागाचा निकाल पुढीलप्रमाणे तृतीय वर्ष कॉम्प्युटर साक्षी साळवेकर (९०.६९), विवेक चौगुले (८९.३७), मेकॅनिकल ओम बसरीकट्टी (८७.९०), आर्या पेडणेकर (८६), इलेक्ट्रिकल जयश्री होली (८७.१७), सानिका शिंगटे (८४.६१), इलेक्ट्रॉनिक्स ऐश्वर्या पाटील (८८.९४), सानिका बालाजकर (८७.७६), सिव्हिल  प्रतीक रक्ताडे (८२.८२), श्रीशांत चौगुले (८१.७४), द्वितीय वर्ष कॉम्प्युटर नेहा कुलकर्णी (९३.६०), राणी पोवार (९२.४०),  मेकॅनिकल सिद्धी हावळ (८६.५७), विरेंद्रसिंग रांगणेकर (८५.८५), इलेक्ट्रिकल गीतांजली होशागोळ (८०), 

           तृप्ती मांगले (७९), इलेक्ट्रॉनिक संध्या कुराडे (८०), सृष्टी इंगवले (७६), सिव्हिल श्रद्धा पट्टणशेट्टी (९१.७२), अबूसुफियाना चांद (८२), डी. एम. एल. टी. द्वितीय वर्ष रिया तारी (८४.४५), चेतना पाटील (८४.४५), प्रथम वर्ष वेदांत पोटेपाटील (८९), कुणाल नाईक(८६) टक्के गुण मिळवित अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण यांनी अभिनंदन केले तर प्राचार्य प्रा. डी. बी.केस्ती व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

No comments:

Post a Comment