शामरंजन फाउंडेशच्या पुरस्कारांचे वितरण १६ रोजी बेळगावात, पद्मश्री डॉ. कोल्हे व जादुगार प्रेम आनंद यांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2022

शामरंजन फाउंडेशच्या पुरस्कारांचे वितरण १६ रोजी बेळगावात, पद्मश्री डॉ. कोल्हे व जादुगार प्रेम आनंद यांची उपस्थिती

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          शामरंजन बहुउद्देशीय फाउंडेशन मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्यावतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्ती व संघटना यांचा सन्मान सोहळा १६ रोजी बेळगावात संपन्न होणार आहे. 

           'राष्ट्रीय संस्कृती संगम संमेलन, बेळगाव २०२२' बॅनर अंतर्गत बेळगाव येथे  मंगळवार दि. १६ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता लोकमान्य रंगमंदिर रिझ टॉकीज कोनवाळ गल्ली बेळगाव येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमास थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ स्मिता कोल्हे व जादुगार प्रेम आनंद (प्रेमानंद पाटील) यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती राहणार आहे. 

           कार्यक्रमात भारत कर्तव्य समाज भूषण पुरस्कार, शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप पुरस्कार, राष्ट्रीय लोकप्रतिमा पुरस्कार, राष्ट्रीय संस्कृती भूषण पुरस्कार, महाराष्ट्र- कर्नाटक मानवता पुरस्कार, महाराष्ट्र- कर्नाटक शौर्य पुरस्कार आदी पुरस्कारांचे वितरण यावेळी होणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमापूर्वी गोवा येथील सुप्रसिद्ध जादूगार पाटील यांचा यांचे नेत्रदीपक, प्रेक्षकांना जागेवर खिळवून टाकणारे जादूचे प्रयोग होणार आहेत. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment