'अमृत जवान अभियान' अंतर्गत चंदगड येथे सोमवारी आजी-माजी सैनिकांचा मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2022

'अमृत जवान अभियान' अंतर्गत चंदगड येथे सोमवारी आजी-माजी सैनिकांचा मेळावा

बैठकीत मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, सोबत तहसीलदार विनोद रणावरे.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

           चंदगड तालुक्यातील माजी सैनिक, सध्या सेवेत असलेले सैनिक, दिवंगत व शहीद जवानांचे कुटुंबीय यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी 'अमृत जवान अभियान २०२२' अंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

          प्रशासकीय इमारत हॉल, तहसील कार्यालय चंदगड येथे सोमवार दि. ८ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १२ वाजता होणाऱ्या मेळाव्यास तालुक्यातील आजी-माजी सैनिक शहीद जवानांचे कुटुंबीय यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. ज्यांच्या समस्या असतील त्यांनी लेखी अर्ज व जरूर त्या कागदपत्रासह उपस्थित राहून उपक्रमाचा लाभ घ्यावा. 

        असे आवाहन गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. यासंदर्भातील नुकत्याच चंदगड येथे झालेल्या नियोजन बैठकीत तहसीलदार विनोद रणवरे, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

No comments:

Post a Comment