तुडये जि. प. मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
सामाजिक क्षेत्रात ॲड. संतोष मळवीकर यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. सर्वसामान्य जनतेसाठी २४ तास झटत असतात. मतदारांनी मळवीकर यांच्या कार्याची परतफेड म्हणून तुडये जि. प. मतदार संघातून त्यांना बिनविरोध द्यावे असे आवाहन अथर्व इंटरड्रेड प्रा. लि. चे मालक मानसिंग खोराटे यांनी केले. तूडये जि. प. मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच राजेंद्र कांबळे होते.
स्वागत व प्रास्ताविक जयवंत पेडणेकर यांनी केले. यावेळी श्री. खोराटे पुढे म्हणाले, ``ॲड. मळवीकर यांची काम करण्याची पद्धत निपक्षपाती आहे. त्यामुळे त्यांचा कोणताही पक्ष अथवा नेता असो आपला व कर्मचाऱ्यांचा पाठिंबा त्यांना राहील. मी आतापर्यंत राजकारणात कोणत्याही पक्षाचा अथवा व्यक्तीचा प्रचार केला नाही. तीन वर्षांपूर्वी मळवीकर यांचे कार्य कोल्हापूरला ऐकून होतो. पण दौलत घेतल्यापासून प्रत्यक्ष त्यांचे काम बघत आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्यांच्या हक्कासाठी त्यांनी उभारलेले लढे निश्चित कौतुक करण्यासारखे आहेत. तेव्हा मतदारसंघातील मतदारांनी मळवीकर यांच्या कार्याची दखल म्हणून यांना बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन खोराटे यांनी केले.
यावेळी अशोक दळवी आपल्या म्हणाले, ``यावेळी तूडये मतदारसंघातील उमेदवार हा बाहेरचा नसावा तो भागातीलच असावा यासाठी मतदारसंघातील मतदारांनी पक्ष विसरून एकत्र यावे असे आवाहन केले. जे. जी. पाटील, दयानंद गावडे म्हणाले ॲड. मळवीकर यांनी कोणत्याही पक्षातून निवडणूक लढवली तरी ह्यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.यावेळी हेरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, बाबुराव पाटील, अरुण पाटील, नामदेव गावडे, आप्पाजी गावडे, मारुती पाटील, संजय गावडे, संतोष गावडे जयसिंग पाटील, संदीप गावडे, बाबू बापू शिरगावकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन विठ्ठल गावडे यांनी तर आभार सुनील शिंदे यांनी आभार मानले.
इतिहासात प्रथमच हेरे विभागातील सर्व मतदार पक्षाचा व नेत्यांचा विचार न करता एकत्र आले होते. जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून प्रथमच संधी या मतदारसंघाला मिळणार आहे. बैठक चालू असताना पावसाने हजेरी लावली परंतु कार्यकर्त्यांचा जोश एवढा होता की भर पावसात भिजत सभा पार पडली.
No comments:
Post a Comment