चंदगड तालुक्यातील बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशन तडशिनहाळ संघटनेच्या वतीने तालुक्यातील चंदगड व सुळये येथील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या ४० कामगारांना सुरक्षा किट व अत्यावश्यक सेवा संचाचे वाटप करण्यात आले.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष कल्लापान्ना निवगीरे म्हणाले संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई ह्या मंडळाकडे करून त्यांना स्मार्ट कार्ड, सुरक्षा किट, अत्यावश्यक सेवा संच, मध्यान्ह मोफत भोजन, या सह त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना अशा शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यात येत आहे.
तालुक्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी तडशिनहाळ फाटा येथील कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करावी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आसे आवाहन केले. यावेळी कामगार संघटनेच्या महिला अध्यक्ष सौ. लक्ष्मी निवगीरे, सौ. भारती शेडगे, सौ. पुनम पाटील, सौ. दुर्वा पेडणेकर, सौ. छाया कांबळे, विद्या कांबळे, रघुनाथ पाटील यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment