अपघातात पलटी झालेली कार |
बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा
पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काकती (ता. जि. बेळगाव) येथे कारची दुभाजकाला धडक बसल्याने पती, पत्नी गंभीर जखमी झाले. अपघातात कृष्णा बाबले आणि त्यांची पत्नी जखमी झाले आहेत. बाबले पती व पत्नी कारमधून गोव्याला निघाले होते.
कार दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना नियंत्रण सुटून दुभाजकाला जाऊन आदळली आणि पलटी झाली. कार दुभाजकाला आदळून पलटी झाल्यावर मोठा आवाज झाला. आवाज ऐकून तेथील लोक धावून आले आणि त्यांनी कारमधून प्रवास करणाऱ्या पती, पत्नीला बाहेर काढले.
अपघाताची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी कार बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
No comments:
Post a Comment