पुरस्कार स्विकारताना ॲड.संतोष मळविकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महिनाभरापूर्वी चंदगड तालुक्यातील काही तरुणांना गोव्यामधे ब्लकमिलींग करुण मारहाण करत पैसे लुटले होते. या तरुणांना न्याय देण्यासाठी ॲड. संतोष मळवीकर यांनी विशेष प्रयत्न करून तरूणांना न्याय मिळवून दिला.
याची दखल घेऊन अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने कोल्हापुर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिरगांवकर यांच्या हस्ते ॲड. संतोष मळविकर यांचा समाजरत्न अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्र शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि देवुन गौरव करण्यात आला.
यावेळी दौलत-अर्थवचे अध्यक्ष मानसिंगराव खोराटे, जे. जी. पाटील, सरपंच संजय कांबळे, जयसिंग पाटील, बाबुराव पाटील, संजय गावडे, डाॅ. सुनिल शिंदे, नामदेव गावडे, तंटामुक्त कमिटी अध्यक्ष, संस्था चेअरमन यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment