संग्रहित छायाचित्र |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिन सोमवार दिनांक १५/०८/२०२२ रोजी सर्वत्र साजरा होत आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त चंदगड पोलीस ठाणे येथे सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त चंदगड पोलीस ठाणे यांचे वतीने सकाळी १०.०० वाजता चंदगड शहरातून भव्य रॅलीचे आयोजन केले आहे. रॅलीसाठी तहसीलदार विनोद रणवरे, प्रथमवर्ग न्यायाधीश ए. सी. बिराजदार, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे यांच्यासह तालुक्यातील विविध अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहीती चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोेष घोळवे यांनी दिली.
चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्षा, सर्व नगरसेवक, तालुक्यातील सर्व माझी सैनिक, सर्व वनविभागाचे कर्मचारी, तालुक्यातील सर्व पत्रकार, तालुक्यातील सर्व सरपंच, सर्व पोलीस पाटील, तालुक्यातील सर्व एन. सी. सी. एन. एस. एस. कॅडेट्स यांच्यासह नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन चंदगड पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. रॅली चंदगड पोलिस ठाण्यातून निघणार असल्यामुळे सर्वांनी चंदगड पोलिस ठाणे येथे उपस्थित रहावे.
No comments:
Post a Comment