चंदगड येथील संभाजी चौकात शिवकालीन युद्ध नीतीची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पास रेस्क्यू फोर्स, चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन युद्ध नीतीची प्रात्यक्षिके (जसे- दांडपट्टा, तलवारबाजी, लाठी-काठी व स्वबचावाचे तंत्र, मर्दानी खेळ, योगाभ्यास,आरोग्याची काळजी इ.) या सर्व गोष्टींची विस्तृत माहिती प्रेक्षकांना, स्वयंसेवक, विद्यार्थी यांना समजावून सांगण्यात आली. प्रेक्षकांचा या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. यातील अनेक गोष्टी आत्मसात करणे सोपे झाले. शिव-निश्चय तालीम, बेळगाव ग्रुप यांच्या वतीने ही प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
या उपक्रमासाठी श्रीपाद सामंत व पास रेस्क्यूचे सर्व सदस्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी व कोल्हापुर जिल्हा समन्वयक प्रा. संजय पाटील सर्व स्वयंसेवक, सौ. प्रमिला पाटील यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, माडखोलकर महाविद्यालय व पास रेस्क्यू फोर्स चंदगड यांनी सातत्याने असे समाज प्रबोधनात्मक व नव्या पिढीला दिशा देणारे उपक्रम राबवून युवकांमध्ये ऊर्जा व प्रेरणा निर्माण केली आहे. समाजाला दिशा देणाऱ्या या कार्याचे समाजातून नेहमीच कौतुक होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये या उपक्रमांना अधिकाधिक गती मिळाली आहे. यापुढेही असेच उपक्रम सातत्याने राबविण्याची व समाजाशी नाळ जोडण्याची नवउर्जा युवकांमध्ये निर्माण झाली आहे.
No comments:
Post a Comment