कागणी : सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) केंद्रीय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी एकनाथ कांबळे, उपाध्यक्षपदी अमोल हरारे यांची निवड झाली. सोमवारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी गुंडूराव तातोबा तुडयेकर होते. शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात झाली. प्रास्ताविक व समितीचे कार्य, निवड प्रक्रिया या विषयी माहिती मुख्याध्यापक अशोक बेनके यांनी सांगितली. यावेळी सर्वानुमते निवडलेली समिती पुढील प्रमाणे.
शाळा व्यवस्थापन समिती
१ ) एकनाथ ओमाणा कांबळे (अध्यक्ष)
२ ) अमोल अंकूश हरारे (उपाध्यक्ष)
३ ) प्रकाश रुक्माणा ल्हासे (सदस्य)
४ ) भावकू जोतिबा मोरे (सदस्य)
५ ) सुभाष संतू नाईक (सदस्य)
६ ) तुकाराम मारूती कांबळे (सदस्य)
८ ) लक्ष्मी रमेश नाईक (सदस्या)
९ ) शितल राजू कडूकर (सदस्या)
१० ) शारदा सतीश जाधव (सदस्या)
११) कमल पांडूरंग केसरकर (सदस्या)
१२) शांता तुकाराम नाईक (सदस्या)
१३) दिपाली निलेश कुचेकर (सदस्या)
यावेळी उपसरपंच रमेश सुतार, माजी अध्यक्ष दशरथ नाईक, नरसू नाईक, प्रतिक्षा सावंत, अशोक नाईक, त्याचबरोबर शाळेतील शिक्षक व बहुसंख्येने पालक उपस्थित होते. आभार सुभाष चांदिलकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment