जिल्हास्तरीय पोहण्याच्या स्पर्धेत भगतसिंग गावडेला सुवर्ण पदक - चंदगड लाईव्ह न्युज

21 August 2022

जिल्हास्तरीय पोहण्याच्या स्पर्धेत भगतसिंग गावडेला सुवर्ण पदक

 

बेळगाव येथील पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा भगतसिंग गावडे.

बेळगाव  / सी. एल. वृत्तसेवा

          बेळगाव येथील मराठा युवक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोहण्याच्या स्पर्धेत भगतसिंग भारत गावडे (वय वर्षे ७) पोहण्याच्या विविध प्रकारात एक सुवर्णसह तीन पदकांची कमाई केली. भगसिंग हा हलकर्णी फाटा ता. चंदगड येथील भगतसिंग अॕकॕडमीचे भारत गावडे यांचा चिरंजीव आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
       कोरोना काळापासून तब्बल तीन वर्षे बंद असणारा सराव, बेळगाव परिसरात बिबट्याच्या वावरामुळे सध्या असलेलं भितीच वातावरण, पाऊस अशा अनेक संकटांना प्रतिकार करत भगतसिंग याने या स्पर्धेत घवघवीत यश मिळवलं आहे. २५ मिटर किक बोर्ड प्रकारात सुवर्ण, २५ मिटर फ्री स्टाईल मध्ये  सिल्वर तर २५ मिटर बॕकस्ट्रोक प्रकारात ब्रॉंज पदक पटकावले आहे. भगतसिंग याला त्याचे प्रशिक्षक अजिंक्य सर, रोहन सर आणि मंजुनाथ सर यांचे मार्गदर्शन लाभले.


 

No comments:

Post a Comment